मार्सेल दुशां - “माझा कलेवर विश्वास नाही, पण कलावंतांवर आहे.”
मार्सेल दुशां विसाव्या शतकातील एक अत्यंत महत्त्वाचे कलाकार व कलासमीक्षक म्हणून ओळखले जातात. महायुद्धोत्तर कालखंडातील कला व साहित्य क्षेत्रावर त्यांच्या कार्याचा प्रभाव हा विलक्षण असा राहिला आहे. कलासंग्रहाच्या संदर्भात व कला दालनाच्या प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले गेले आहे. या अशा त्यांच्या प्रयत्नांतून त्यांनी पाश्चात्त्य कलेच्या विकासात महत्त्वाची भर घातली आहे.......